वाडा-कडूस जिल्हा परिषद गटाबरोबरच पश्चिम भागाला खेड तालुक्यात विकासाचे रोलमॉडेल बनवणार-तनुजा संदिप घनवट!

वाडा-कडूस जिल्हा परिषद गटाबरोबरच पश्चिम भागाला खेड तालुक्यात विकासाचे रोलमॉडेल बनवणार-तनुजा संदिप घनवट!

निवृत्ती नाईकरे पाटील
मु.पो.ग्रामीण.

खेड तालुक्यातील पश्चिम भागातील जनतेशी सामाजीक बांधिलकी तयार झाली आहे.जनतेप्रती असलेले हे जिव्हाळ्याचे नाते कायमस्वरूपी टिकणार असून, वाडा-कडूस जिल्हा परिषद गटाबरोबरच पश्चिम भागाला खेड तालुक्यात विकासाचे रोलमॉडेल बनवायचे असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्या तनुजा घनवट यांनी केले.
रानमळा (ता.खेड) येथे शिवसेना उपतालुका प्रमुख संजय घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद सदस्या तनुजा घनवट यांच्या प्रयत्नातून सुमारे ३३ लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन घनवट यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी बोलत होत्या.
यावेळी सरपंच प्रमोद शिंदे, चंद्रकांत बारणे, उपसरपंच रोहिणी दौंडकर, पी.टी शिंदे, यादवराव शिंदे, अरविंद दौंडकर, जि.र शिंदे, दशरथ भुजबळ, गोरक्ष सुकाळे,शितल वाघोले, रेश्मा दौंडकर, प्रिया सुकाळे, सुगंधा पारधी, सुरेश गावडे, बाजिराव शिंदे, मोहन सुकाळे, मच्छिंद्र मोरे, शरद सुकाळे, आदी सह ग्रामस्थ उपस्थित होते.