वाडा ता.खेड मोसेवाडी येथे बिबट्याचा बछडा वनविभागाच्या ताब्यात.

वाडा ता.खेड मोसेवाडी येथे बिबट्याचा बछडा वनविभागाच्या ताब्यात.

निवृत्ती नाईकरे पाटील
मु.पो.ग्रामीण.

वाडा ता.खेड येथील मोसेवाडी येथे श्री संजय मोसे यांच्या घराच्या पाठीमागील भागात बिबट्याचा बछडा दिसला.त्यांनी इतर युवकांच्या मदतीने बछड्यास पकडून वनविभागाच्या कर्मचार्‍यांना कळवले.वनविभागाने बछड्यास ताब्यात घेवून मोसेवाडी जवळ मोठ्या प्रमाणात जंगल असून,आज राञी जंगलात ठेवण्यात येणार आहे म्हणजे मादी बिबट्या ते घेवून जाईल.नागरिकांनी काळजी घ्यावी असे अहवान वनविभागामार्फत करण्यात आले आहे.