वाडा ता.खेड येथे किरकोळ कारणावरून हाणामारी!एकमेकांविरोधात गुन्हे दाखल!

वाडा ता.खेड येथे किरकोळ कारणावरून हाणामारी!एकमेकांविरोधात गुन्हे दाखल!

राजगुरूनगर प्रतिनिधी
मु.पो.ग्रामीण

वाडा ता.खेड येथे किरकोळ कारणावरून हाणामारी झाली असून,!एकमेकांविरोधात खेड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल झाले आहेत.
सविस्तर बातमी खेड पोलीस स्टेशनच्या माहितीवरून पुढीलप्रमाणे-
राजश्री सुनिल वाडेकर यांच्या फिर्यादीवरून
1)सरपंच रघुनाथ लांडगे 2)पंढरीनाथ लांडगे 3)ओंकार लांडगे 4)जगन्नाथ लांडगे 5) तेजस लांडगे 6)जाकिर इनामदार सर्व रा.वाडा ता.खेड जि.पुणे
ता.31/08/2021रोजी सकाऴी11/30वा. सर्व रा.वाडा ता.खेड जि.पुणे यांनी बेकायदा गर्दि जमाव जमवुन तुम्ही इथे सांडपाणी का टाकता का असे म्हणुन माझे घरात अनाधिकृतपणे प्रवेश करुन मला घरातुन बाहेर ओढुन घराच्या ओट्यावर आणुन दगडाने मारुन माझे डावे कानावर मारुन पोटात लाथ मारली,सरपंच रघुनाथ लांडगे यांनी त्यांचे हातातील चाकुने भाउ श्रीनाथ याचे तोंडावर मारुन दुखापत केली त्यावेऴी माझे आई वडिल हे सोडविण्यासाठी मध्ये आले असता त्यांना वरिल लोकांनी हाताने लाथाबुक्क्यानी मारहान करुन सरपंचाने माझी आई सौ.शारदा सुनिल वाडेकर हिचे डोक्यात दगड मारुन दुखापत केली आहे व आम्हाला सगऴ्यांना वाईट शिविगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली.व आमची स्विफ्ट गाडी नं.MH.14.FS.4921वर तेजस लांडगे हा चडुन गाडीचे बोनेट चेंबवुन नुकसान केले त्या भांडणात माझा भाउ श्रीनाथ सुनिल वाडेकर यांची चैन खाली पडुन गहाऴ झाली आहे.सदर मारहानीत माझे वडील सुनिल वाडेकर यांना उजव्या पायाचे बोटाला मार लागला आहे.अशी फिर्याद दाखल केली असून या घटनेचा
तपास सहा फौजदार गिजरे करत आहेत.

रघुनाथ सदाशिव लांडगे वाडा गावचे सरपंच रा वाडा यांच्या फिर्यादीवरून ,ता.31/08/2021 रोजी दुपारी 1/00 वा.चे सुमारास मौजे वाडा गावचे हद्दीत नारायणशेठ रोड गल्लीमध्ये सुनिल वाडेकर यांचे घरासमोर 1) सुनिल कोडींबा वाडेकर,2) शारदा सुनिल वाडेकर 3) श्रीनाथ सुनिल वाडेकर 4) राजश्री सुनिल वाडेकर सर्व रा. वाडा ता खेड जि पुणे यांनी कचरा व सांडपाणी तुम्ही जाकीर ईनामदार याचे घरासमोरील गटाराची फरशी काढुन का टाकता असे विचारलेचे कारणावरुन मी व ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर सुरकुले, दत्ता भालेराव, लक्ष्मण खाणविलकर, माजी सरपंच जाकीर तांबोळी असे आम्ही शारदा सुनिल वाडेकर हीस समजावुन सांगत असताना सुनिल वाडेकर याचा मुलगा श्रीनाथ सुनिल वाडेकर यांने त्याचे घरासमोर रोडवर पडलेली विट उचलुन माझे उजवे डोऴ्यावर फेकुन मारुन माझे डोऴ्यास दुखापत करुन तसाच तो घरात पळत जावुन त्यांने खो-याचा दंडा हातात घेवुन आला व त्या खो-याचे दंडयाने उजवे हाताचे दंडावर व सुनिल कोंडीभाउ वाडेकर यांने त्याचे हातात असलेले कोणत्या तरी धारदार हत्याराने माझे उजवे हाताचे अंगठयाजवळील बोटावर, मारुन दुखापत केली त्यावेऴी सुनिल वाडेकर त्याची पत्नी शारदा व मुलगी राजेश्री या दोघीनी मला व भाऊ पंढरीनाथ लांडगे यास हाताने लाथाबुक्क्यानी मारहाण करुन शिवीगाळ दमदाटी जीवे मारण्याची धमकी दिली व श्रीनाथ सुनिल वाडेकर यांने माझा भाउ पंढरीनाथ वाडेकर यांचे उजवे खांद्यावर व उजवे हाताचे मनगटावर मारुन उजवे हाताचे मनगटाचे हाड फँक्चर करुन दुखापत केली अशी फिर्याद दाखल केली आहे.सहा फौजदार जाधव या घटनेचा तपास करत आहेत.