वाडा ता.खेड येथे गुरुजनांचा सेवापुर्ती व पदोन्नती समारंभ

वाडा ता.खेड येथे गुरुजनांचा सेवापुर्ती व पदोन्नती समारंभ

निवृत्ती नाईकरे पाटील
मु.पो.ग्रामीण

समाजासाठी अहोरात्र झटणारे व शिक्षणाची ज्ञानगंगा पोहचवणारे गुरुजन यांचा आपण नेहमीच आदर करतो विद्यार्थ्यांची जडणघडण जेवढी आई-वडिलांची कर्तव्य तेवढीच शिक्षकांचीही कर्तव्य असतात अशा या गुरुजनांचा सेवापूर्ती व पदोन्नती समारंभ वाडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे पार पडला.

वाडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे सुरकुलवाडी व आव्हाट केंद्रातील शिक्षकांचा सेवानिवृत्त व पदोन्नती समारंभ पार पडला यावेळी ढगाडवाडी शाळेचे शिक्षक पंढरीनाथ ओव्हाळ, लांडगेवाडी चे शिक्षक शंकर भागीत, सुरकुंडी चे शिक्षक सुभाष पोटकुले, घारेवाडी चे शिक्षक दत्तात्रय मिलखे ही आपल्या सेवेतील कार्यकाळ संपवून सेवानिवृत्त झाले त्यांचे आदरार्थी केंद्रातील शिक्षकांनी मिळून समारंभ आयोजित केला तसेच शिक्षिका प्रगती कड यांचा पदोन्नती निमित्त सन्मान करण्यात आला या कार्यक्रमामुळे शिक्षकांनी केलेल्या कार्याला झळाळी मिळेल आणि त्यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा संधी यानिमित्त राहील. उतार वयासाठी आर्थिक व्यवहार स्वतःजवळ ठेवुन तुमच्या उतार वयात त्याचा तुम्हाला मोठा फायदा होईल असे मत शिक्षण विस्ताराधिकारी कळमकर यानी व्यक्त केले. कार्यक्रम प्रसंगी खेड पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी बाळकृष्ण कळमकर, जीवन कोकणे, केंद्रप्रमुख वनराज कहाणे मुख्याध्यापक कोंडिभाऊ डामसे, सुरकुले, नाना पोटे, जंगम आणि केंद्रातील आजी-माजी शिक्षक व सेवानिवृत्त शिक्षकांचे नातेवाईक आणि ग्रामस्थ ही मोठ्या प्रमाणात उपस्थित होते कार्यक्रमाचे नियोजन दोन्ही केंद्रातील शिक्षकांनी केली असून कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार अभिजीत नाईकरे यांनी केले संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मच्छिंद्र जगदाळे यांनी केले.