वाडा ता.खेड येथे ग्रामपंचायत १५ वा वित्त आयोग अंतर्गत विकास कामाना सुरवात

वाडा ता.खेड येथे ग्रामपंचायत १५ वा वित्त आयोग अंतर्गत विकास कामाना सुरवात

वाडा दि. ३०  प्रतिनिधी आदेश भोजने

खेड तालुक्यातील पश्चिम भागातील वाडा येथे ग्रामपंचायत १५ वा वित्त आयोग अंतर्गत विकास कामाना सुरवात झाली आहे. वाडा गावठाण येथे बंदीस्थ गटारीचे आज भूमिपूजन करण्यात आले. गावचा परिसर वाढल्यानंतर अनेक अडचणी येत होत्या ग्रामस्था ना अनेक अडचणी येत होत्या. ग्रामपंचायत १५ वा वित्त आयोग च्या माध्यमातून अनेक कामे करण्यास सुरवात झालेली आहेत. कामाची सुरवात  झाल्याने ग्रामस्थचे अनेक दिवसा पासून येत असलेल्या अडचणी दूर होणार असल्याने ग्रामस्थ यानी  समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाचे उदघाटन सरपंच रघुनाथ लांडगे यांचे हस्ते करण्यात आले. कार्यक्रम प्रसंगी माजी सरपंच जाकीर तांबोळी, माजी उपसरपंच ज्ञानदेव सुरकुले, ग्रामविकास अधिकारी मच्छिंद्र मस्के, चेअरमन कैलास हुंडारे, नागेश हुंडारे, अविनाश आंद्रे उपस्थित होते.