वाडा ता.खेड येथे पल्स पोलिओ मोहीम यशस्वी.

 

 

 

 

 

 

 

वाडा प्रतिनीधी-आदेश भोजणे

वाडा ता.खेड येथे पल्स पोलिओ मोहीम यशस्वी.

खेड तालुक्यातील पश्चिम भागात रविवार दि. ३१ रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिम प्रभावी रित्या राबविन्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व उपाय योजना घेवुन प्राथमिक आरोग्य केंद्र वाडा येथे आज १५ दिवसाच्या बाळाला पल्स पोलिओ मोहिम अंतर्गत पोलिओ देऊन मोहिम सुरु करण्यात आली.
प्राथमिक आरोग्य केंद्र वाडा अंतर्गत एकुण १६ गावे असून विविध २७ ठिकाणी बूथ लावून या मोहिमे पासुन कोणी वंचित राहू नये याबाबत दक्षता घेतली आहे. राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिम बाबत आरोग्य केंद्रा मार्फत मोबाईल व्हॅनद्वारे जन जागृती केली. सदर मोहिमेसाठी एकून २ डॉक्टर व ५८ कर्मचारी व आशा वर्कर कार्यरत होते. तालुक्यातील पश्चिम भागातील वाडा ही मोठी बाजार पेठ असल्याने वाडा ग्रामपंचायत जवळ १ बूथ असुन सदर ठिकाणी येणारे जाणारे अनेक बालकांना त्याचा फायदा झाला. मोहिमे अंतर्गत काल मोबाईल व्हॅनद्वारे परिसरातील विटभट्टी व फिरस्त कुटुंबातील ७५ बालके यांना समक्ष जावून पोलिओचा डोस देण्यात आले. दुर्गम भाग असुनही मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाला असल्याची महिती वैद्यकिय अधिकारी डॉ. निखिल अडकमोल, यांनी दिली.
पल्स पोलिओ मोहिम कार्यक्रमाला तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. बळीराम गाढवे, श्री. ढाकणे, श्री. म्हांकाळे विस्तार अधिकारी यांनी समक्ष भेट देऊन पाहणी करून मार्गदर्शक सुचना केल्या. पल्स पोलिओ मोहिम सकाळी ८ वाजता १५ दिवसाचे बालक शिवा प्रमोद भोजने याला सरपंच रघुनाथ लांडगे व सदस्या कुमोदिनी केदारी यांचे हस्ते देऊन मोहिमेला सुरुवात करण्यात आली. कार्यक्रम प्रसंगी डॉ. निखिल अडकमोल, डॉ. गणेश नागरगोजे, आरोग्य सेविका यु.डी. दगडे, आरोग्य सेवक के.व्ही. गायकवाड, अर्चना तांबे, स्वाती भोजने, सुमन झुंजूरटे, लता हुंडारे, प्रकाश पाटिल ग्रामस्थ विजय वांभुरे, दीपक घनवट, बाबुशा मोरे, श्रीपती कहाणे उपस्थित होते.
———————————————————————

राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिम प्रभावीपणे राबविन्यात येत आहे. या लसीकरणा पासुन ० ते ५ वयोगटातील कोणतेही बालक वंचित राहू नये या करिता हद्दीत २७ बुथ लावण्यात आले आहे. २ मोबाईल व्हॅनद्वारे परिसरात जनजागृती केली. दुर्गम भाग असुनही मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
वैद्यकिय अधिकारी डॉ. निखिल अडकमोल, प्रा. आ. केंद्र वाडा
———————————————————————