वाडा ता.खेड येथे प्रजासत्ताक दिनानिमीत्त कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व अॅड.राम जनार्दन कांडगे कनिष्ठ महाविद्यालय व माजी विद्यार्थी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यालयात स्पर्धा परीक्षा केंद्र व अभ्यासिका यांचे उद्घाटन.

वाडा (ता. खेड) येथे विविध शासकीय, निम शासकीय कार्यालये तसेच ग्रामपंचायत मध्ये ७२ वा प्रजासत्ताक दिन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साध्य पदधतिने साजरा करण्यात आला. प्रजासत्ताक दिनाच्या ओचित्य साधून ग्रामीण भागातील विद्यार्थी स्पर्धेत टिकावे व अधिकारी बनावे या हेतूने कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व अॅड.राम जनार्दन कांडगे कनिष्ठ महाविद्यालय व माजी विद्यार्थी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यालयात स्पर्धा परीक्षा केंद्र व अभ्यासिका यांचे उद्घाटन करण्यात आले. स्कूल कमिटी सदस्य संभाजी रामचंद्र वाडेकर यांच्या हस्ते पार पडला.
या वेळी वाडा गावाचे सरपंच रघुनाथ लांडगे, पंचायत समितीचे माजी सभापती काळुराम सुपे, ग्रामपंचायत सदस्य कुमुदिनी ताई केदारी, सुरेखा कहाणे, लक्ष्मण खानविलकर, किरण हुंडारे, पोलीस पाटील दिपक पावडे, पोलीस अधिकारी संतोष लांडगे, श्रीपती कहाणे गुरूजी, गोरक्षनाथ हुंडारे, कैलास हुंडारे, गोरक्षनाथ मोरे, दत्तात्रय मोरे, सुनिल पावडे, सचिन थोरात, सचिन बोऱ्हाडे, शशिकांत पावडे, दिलीप बच्चे, ग्रंथपाल शाम एरंडे उपस्थित होते.