वाडा ता.खेड येथे शिवरात्री साध्या पद्धतीने साजरी.

वाडा दि. १२ प्रतिनिधी आदेश भोजने
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा भाविकाना शिवरात्री साध्या पद्धतिने साजरी करावी लागल्याने भाविक हळहळ व्यक्त करत आहेत. शव पासून शिव होण्याचा प्रवास म्हणजे मूळापासून चैतन्य होण्याचा प्रवास आहे. ‘शिवरात्रि’ या सणानिमित्त महादेवाची पूजा करण्याचे खूप महत्त्व असल्याचे सांगितले गेले आहे. या दिवशी शिव मंत्र जप-हवन-अभिषेक हवन याचे महत्त्व आहे. मंदिरात जाणे शक्य नसल्यास घरी देखील महादेवाची विधीपूर्वक पूजा करावी पूजा करताना अनेक प्रकाराचे शिवलिंग आपल्या आवश्यकतेनुसार पुजले जातात असे शिवालयाचे पुजारी संजय वाडेकर यांनी सांगितले. काल दि. ११ रोजी वाडा येथे शिवरात्रीनिमित्त शिवालयात आकर्षक अशी सजावट करण्यात आली. पहाटे शिवलिंगाला अभिषेक मंदिराचे विश्वस्त शिवराम पावडे यांचे हस्ते मोजक्या लोकांचे उपस्थितीत करण्यात आला. दुपारी भजनाचा कार्यक्रम पार पडला. सायंकाळी ग्रामपंचायत सदस्या कुमोदिनी केदारी, शांताबाई लांडगे, सुरेखा कहाणे, सायली केदारी, प्रिया पाबळे, हिराबाई लांडगे, चंचल केदारी, शारदा केदारी, यांनी ११०० बेलपत्र वाहून व ११०० दिवे लावून दिव्यांची आरस केली. मोठ्या प्रमाणात दिवे लावल्याने मंदिर परिसर उजळुन निघाला. मंदिराला मोठ्या प्रमाणात विधुत रोशनाई तसेच फुलानी सजावट करण्यात आली.
बारा ज्योतिर्लिंग पैकी एक असलेले भिमाशंकर देवस्थान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असल्याने भाविकांची मोठी निराशा झाली परंतु शिवरात्री निमीत्त गाव व पंचक्रोशितील लोकानी कोरोनाच्या वाढता प्रादुर्भाव लक्षात घेवुन योग्यती काळजी घेत गर्दी न करता दर्शन घेवुन समाधान व्यक्त केले. कार्यक्रम दैनंदिन आरती व पूजा पुजारी मंगेश राजगुरव, लक्ष्मण गायकवाड, बाळासाहेब सासवडे, भरत केदारी, राम शिंदे, बाळासाहेब राजगुरव यानी केली. कार्यक्रम वाडे ग्राम देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष बाळासाहेब शेटे, उपाध्यक्ष शिवराम पावडे, भगवान लांडगे, देवराम शेटे, उल्हास हुंडारे, बन्सीलाल लांडगे, शशिकांत वाडेकर, सुनील पावडे, गोरक्षनाथ मोरे, सुनील पावडे, सखाराम लांडगे, अदि च्या सहककर्याने कार्यक्रम कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती काळजी घेत पार पडला.