वाडा येथे ग्रामदैवत श्री धर्मनाथ महाराजांचा उत्सव साधेपणाने साजरा

 

वाडा येथे ग्रामदैवत श्री धर्मनाथ महाराजांचा उत्सव साधेपणाने साजरा

वाडा दि. १६ प्रतिनिधी आदेश भोजने
वाडा (ता. खेड) येथील ग्रामदैवत श्री धर्मनाथ महाराजांचा उत्सव मोठ्या श्रध्येने उत्साहात व आनंदात पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने साजरा करण्यात आला. बैलगाडे बंद असल्याने शेतकरी नाराज झाले परंतु शेतकरी राजाने आपल्या सर्जा राजाची मोठ्या दिमाखात मिरवणुक काढून आनंद साजरा केला. या यात्रेचे मुख्य आकर्षण ठरले ते नागरिकांनी शांततेने काढलेल्या बैलांच्या मिरवणुकीत अन नागरिकांच्या मनोरंजनासाठी ठेवलेला भजनांचा कार्यक्रम आहे.
तालुक्‍याच्या पश्‍चिम पट्ट्यातील सर्वात मोठा उत्सव वाडा येथे शनिवार ता. १३ व रविवार ता. १४ रोजी पार पडलेल्या या यात्रेमध्ये शनिवारी भल्या पहाटे श्रींच्या मूर्तीचे महापूजा व अभिषेक झाल्यावर मान्यवरांच्या उपस्थितीत पारंपरिक वाद्याच्या गजरात देवाला हार अर्पण करून हार तुरेचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख व पुणे जिल्हा दूध उत्पा.संघाचे शेखर शेटे यांनी उपस्थिती लावली. राज्याच्या कानाकोपऱ्यातून या ग्राम देवाच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या भक्तिभावाने हजर झाले होते यात्रेचे मुख्य आकर्षण ठरले ते नागरिकांनी उत्साहाने आपल्या लाडक्या सर्जा राजा ला भंडाराने मखावुन गावातून मिरवणूक काढल्या यावर्षीही बैलाच्या मिरवणूक मोठ्या प्रमाणात काढण्यात आलेल्या होत्या. या शिवाय ओम भोमेश्वर प्रासादिक भजन मंडळ, आलमे (ता. जुन्नर) व श्री राम भजन मंडळ भराडी (ता. आंबेगाव) यांच्या भजनांनी यात्रा उत्सवात भक्तिमय वातावरण तयार झाले होते. रात्री देवाच्या पालखी मिरवणूक जय जय धनुर्धर सेवा पालखी मंडळ व पावडेवाडी भजन मंडळाच्या गजरात काढली. रविवारी ता. 14 रोजी दुपारी 12 ते ५ या दरम्यान सोहम संगीत भजन मंडळ घोडेगाव, कमलादेवी भजन मंडळ सुपेवडी वाडा यांच्या भजनाचा कार्यक्रम झाले आणि सुश्राव्य अशी भजने ऐकुन उपस्थितांना मध्ये समाधान पहायला मिळाले. या कार्यक्रमासाठी खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांची उपस्थिती होती.
या उत्सवाचे संपूर्ण नियोजन ग्रामपंचायत वाडा सरपंच रघुनाथ लांडगे, उपसरपंच गणेश लांडगे, पंचायत समिति मा. सभापती काळुराम सुपे, सदस्य किरण हुंडारे, लक्ष्‍मण खानविलकर, ज्ञानदेव सुरकुले, श्रीपती कहाणे, कैलास हुंडारे, सर्व सदस्य व अध्यक्ष व समस्थ यात्रा कमिटी समस्त ग्रामस्थ व युवक तरुण मंडळ सुसंघटित आदर्श सेवा मंडळ मुंबई (नवी मुंबई, दहिसर, ठाणे, घाटकोपर, नाशिक फाटा, भोसरी, चाकण) पुणेकर तरुण मंडळ यांच्या वतीने साजरा करण्यात आला. कार्यक्रम शांततेत पार पडला.
फोटो ओळ :- ग्रामदैवत श्री धर्मनाथ महाराजांचा उत्सव निमित्ताने काढण्यात आलेली हारतुरे प्रसंगी जमलेले ग्रामस्थ. ( फोटो आदेश भोजने)