वाढत्या तापमानात नागरिकांना उसाच्या रसाचा आधार

वाढत्या तापमानात नागरिकांना उसाच्या रसाचा आधार

वाडा दि. ३०  प्रतिनिधी आदेश भोजने

वाढत्या तापमानात अंगाला थंडावा देणारा उसाचा रसाचा हंगाम केवळ तीन ते चार महिन्यात खेड तालुक्यातील पश्चिम भागातील बऱ्याच जणांना थेट रोजगार मिळवून देत आहे. साधारण मार्च महिन्यापासून सुरु झाला की उन्हाळा सुरू झाल्याची चाहूल लागते सध्या तापमान ३० ते ४० अंश सेल्सिअस पोहोचले आहे. सकाळी दहा पासून उन्हाची तीव्रता वाढत आहे. साधारण बारा वाजेपासून ते पाच वाजेपर्यंत उन्हाचे चटके बसतात. उन्हाच्या वाढत्या उष्णतेमुळे अंगाची लाहीलाही होत आहे. दुपारी उन्हाचे चटके बसतात अंगाची काहिली काहिली होत असे असताना आपसूकच नागरिक आणि प्रवाशांची पावले रसवंती गृहाकडे बघताहेत रसाचा एकच प्याला क्षणभरात थंडावा देत आहे थकलेल्या भागलेल्या शरीराला एक प्रकारची ऊर्जा देत आहे. साधारण दहा रुपये पेला रस विकला जात आहे एका उसात साधारण पाच पहिला रस निघतो इंधन व इतर खर्च वेगळा तर दोन रुपये सहज नफा मिळतो असे अर्थकारण विक्रेते ऋषिकेश सोपान वाडेकर यांनी सांगितले. त्यामुळे आपोआप नागरिक आणि प्रवाशांची पावले शरीराला थंडावा मिळावा यासाठी रसवंतीगृह कडे वळत आहेत. रसाचा एखादा प्याला क्षणभरात थंडावा देत आहे. थकल्या भागल्या शरीराला एक प्रकारची ऊर्जा देत आहे रसवंती गृह चालकांना नफा जास्त साधारण दहा रुपये ग्लास रस विकला जातो साधारण एका उसाचे सरासरी तीन ते चार ग्लास रस निघतो ज्यांचे आणि रसवंतीगृह वीज व डिझेल इंजिन वर चालतात त्यांना खर्च वगळला तर दोन रुपये नफा मिळतो परंतु ज्यांची रसवंतीगृह लाकडाची आहेत व ती बैलाने किंवा नागरिकांनी हाताने ओळखतात त्यांना जास्त नफा राहतो. केमिकलयुक्त पिण्यापेक्षा उसाचा रस आरोग्य चांगले आहे त्यामुळे उसाचा रस पिण्यास ग्राहक पसंती देत आहेत असा शुद्ध असल्याने भीमाशंकरला जाणारे व वाळवा परिसरात तील लोक आवर्जून उसाचा रसाचा आस्वाद घेतात. उसाचा रसाचाअस्वाद घेण्यासाठी विजय वांभूरे, गणेश पावडे, खुशाल कहाने, नवनाथ वाडेकर, प्रसाद मोरे जमले होते.