विकासकामांच्या प्रक्रियेबरोबरच शेतकर्‍यांच्या वैयक्तीक समस्या जाणून घेणे गरजेचे-सरपंच योगेशशेठ नाईकरे.

विकासकामांच्या प्रक्रियेबरोबरच शेतकर्‍यांच्या वैयक्तीक समस्या जाणून घेणे गरजेचे-सरपंच योगेशशेठ नाईकरे.

चासकमान प्रतिनिधी
मु.पो.ग्रामीण.

पंचायत व्यवस्थेत विकास कामांची प्रक्रिया निरंतर सुरू असते.परंतु ग्रामीण भागातील गावामध्ये शेती हाच उपजिविकेचा पाया असतो.यामुळे कमानचे सरपंच योगेशशेठ नाईकरे व उपसरपंच मोनिकाताई नाईकरे यांनी महिन्यातील एक दिवस गावातील शेतकर्‍यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी शिवार फेरी या उपक्रमाला सुरवात केली आहे.पावसाचे प्रमाण, पिके याचबरोबर शेतकर्‍यांबरोबर प्रत्यक्ष शेतात जावून गप्पा गोष्टी करणे यामुळे शेतकर्‍यांना असणार्‍या समस्या लक्षात येतात.दर महिन्यातून एकदा शिवार फेरी उपक्रम राबविण्यात येणार असल्याच सरपंच योगेशशेठ नाईकरे यांनी सांगीतले.यावेळी उपसरपंच मोनिकाताई नाईकरे व ग्रामपंचायत सदस्या सुनिता निर्मळ व शेतकरी उपस्थित होते.