वृक्षारोपणा बरोबर वृक्ष संवर्धन करणे हि सुद्धा काळाची गरज–मा.सरपंच श्री.भोलेनाथ कौदरे.

वृक्षारोपणा बरोबर वृक्ष संवर्धन करणे हि सुद्धा काळाची गरज–मा.सरपंच श्री.भोलेनाथ कौदरे.

निवृत्ती नाईकरे पाटील
प्रतिनिधी मु.पो.ग्रामीण.

शनिवार दि.१७जुलै २०२१ खरोशी गावातील श्री.दत्त मंदिर परिसरात वृक्षारोपण लागवड करण्यात आली. श्री. दत्त मंदिर परिसरात वृक्षारोपण लागवडीने सुशोभिकरणात नव्याने भर करण्यात आली.मागील काळात ग्रामपंचायतीच्या माध्यमातुन व ॲड.सुरेशभाऊ कौदरे यांच्या प्रयत्नातुन विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर ते श्री. दत्त मंदिर परिसरा पर्यंत सिमेंट कोन्क्रिटकरण रस्ता पूर्ण करण्यात आला. तसेच श्री.दत्त मंदिर परिसरात् नव्याने सुशोभिकरण करणार.त्याच प्रमाणे,वृक्षारोपण करणे गरजेचे असताना वृक्ष संवर्धन करणे त्या हूनहि काळाची गरज आहे.असे मत मा.सरपंच श्री.भोलेनाथ कौदरे यांनी वक्त केले.श्री.दत्त मंदीर मध्यवर्ती परिसरात वृक्षारोपण कार्यक्रमाच्या वेळेस सामाजिक कार्यकर्ते श्री.अंनत मा.शेलार यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.या वेळी श्री.दत्त मंदिर पुजारी व जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्री. सहदेव वि.शेलार, शिवसेना शाखा प्रमुख श्री.शशिकांत शेलार, इतर तरूण कार्यकर्ते व ग्रामस्थ या वेळी उपस्थित हाेते.