वेताळे येथील १९ वर्षीय युवतीचा राजगुरूनगर भिमानदीकडील दत्तमंदिरात गळफास घेवून आत्महत्या.

वेताळे येथील १९ वर्षीय युवतीचा राजगुरूनगर भिमानदीकडील दत्तमंदिरात गळफास घेवून आत्महत्या.

राजगुरूनगर प्रतिनिधी
मु.पो.ग्रामीण.

वेताळे येथील १९ वर्षीय तरुणीने राजगुरूनगर शहरातील भिमानदी किना-यावरील दत्त मंदिरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
अक्षदा वाळुंज वय १९ असे गळफास घेतलेल्या युवतीचे नांव आहे.आत्महत्याचे कारण अस्पष्ट असुन. अर्जुन विठ्ठल वाळुंज यांनी फिर्याद दिली आहे.
या बाबत खेड पोलिसानी दिलेल्या माहिती नुसार मयत तरुणी आणि लहान बहिण वेताळे येथुन राजगुरूनगरला संगणक कोर्स साठी दररोज एस.टी.ने ये जा करत होत्या होत्या.
क्लास संपल्यानंतर दोघी बहिणी घरी जाण्यासाठी एसटी बसस्थानकात आल्या. दरम्यान मयत अक्षदा हि राजगुरुनगर शहरात जाऊन येते असे सांगुन गेली. मात्र ४ तास वाट पाहूनही अक्षदा परत आली नाही. बहिण सायंकाळी एस.टी ने घरी आली. सकाळी पुजारी पुजा करण्यासाठी दत्त मंदिरात आले असता फाशी मुलीने गळफास घेतल्याचा प्रकार उघडकीस आला. लोखंडी अँगलला ओढणीने अक्षदा हिने फाशी घेतल्या बाबतची खबर पोलिसात देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मयताची ओळख पटवून घरातील कुटुंबाला याची माहिती दिली.आत्महत्या की हत्या यांचे कारण अस्पष्ट असुन पुढील तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक वर्षा राणी घाटे करित आहे.