वेदिका शिंदे या लहान बाळाने अखेरचा श्वास सोडला.सर्वञ हळहळ.

वेदिका शिंदे या लहान बाळाने अखेरचा श्वास सोडला.सर्वञ हळहळ.

पुणे प्रतिनिधी
मु.पो.ग्रामीण.

गेली अनेक दिवस ज्या इंजेक्शनच्या प्रतीक्षेत 11 महिन्याची व वेदिका शिंदे वाट पाहता होती ते 16 कोटी रुपयांचे इंजेक्शन देण्यात आले होते. गेली चार महिने जीवाचे रान करून पिंपरी चिंचवड येथील सौरभ शिंदे यांनी आपल्या मुलीच्या दुर्मिळ आजाराच्या उपचारासाठी लागणारे 16 कोटी रुपये तीन महिन्यात क्राऊडफंडिंगच्या माध्यमातून जमा केले होते. वेदिकाला लागणारे जीन रिप्लेसमेंटचे झोलजेन्स्मा हे औषध दोन दिवसापूर्वीच रुग्णालयात अमेरिकेतून आले होते. ते वेदिकाला पुणे येथील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला देण्यात आले.परंतु एवढे प्रयत्न करूनही या लहान बाळाने अखेरचा श्वास सोडला.तिच्या जाण्याने सर्वञ हळहळ व दु:ख व्यक्त करण्यात येत आहे.