शरदचंद्र सप्ताहानिमित्त पांगरी येथील आश्रम शाळेत खाऊ व फळांचे वाटप!

शरदचंद्र सप्ताहानिमित्त पांगरी येथील आश्रम शाळेत खाऊ व फळांचे वाटप!

निवृत्ती नाईकरे पाटील
मु.पो.ग्रामीण.

देशाचे लोकनेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या 81 व्या वाढदिवसानिमित्त खेड तालुक्याचे कार्यसम्राट आमदार आदरणीय दिलीपराव मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, पुणे जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मलाताई पानसरे यांच्या अध्यक्षतेखाली, शरदचंद्र सप्ताहानिमित्त पांगरी येथील आश्रम शाळेत खाऊ व फळांचे वाटप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे करण्यात आले. यावेळी खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष कैलासराव सांडभोर, पुणे जिल्हा परिषद माजी सदस्य अनिल ऊर्फ बाबा राक्षे, राजगुरूनगर शहराध्यक्ष सुभाष शेठ होले, खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस लिगल सेल अध्यक्ष अरुण मुळूक, राक्षेवाडीचे उपसरपंच मच्छिंद्र शेठ राक्षे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष वैभव शेठ नाईकरे, राजगुरुनगर फाउंडेशनच्या उपाध्यक्षा ॲड मनीषा टाकळकर, उद्योजक रोहिदास शेठ मांजरे, ॲड वाळुंज, इत्यादींसह आश्रम शाळेतील शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.