शहीद जवान संभाजी ज्ञानेश्वर राळे सांस्कृतिक भवनासाठी जिल्हा परिषदेकडून 10 लक्ष रुपये मंजूर.

 

 शहीद जवान संभाजी ज्ञानेश्वर राळे सांस्कृतिक भवनासाठी जिल्हा परिषदेकडून 10 लक्ष रुपये मंजूर.

कुरकुंडी गावचे सुपुत्र,जवान संभाजी ज्ञानेश्वर राळे हे देशसेवेत असताना 6 जानेवारी 2021 रोजी शहीद झाले.त्यांना श्रद्धांजली वाहताना हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता.
दशक्रिया विधी च्या दिवशी शहीद जवान संभाजी ज्ञानेश्वर राळे यांचे घराचे राहिले स्वप्न पूर्ण करण्यासाठी या कुटुंबाला आर्थिक मदत करण्याचा आणि त्यांचे स्मरणार्थ कुरकुंडी येथे सांस्कृतिक भवन बांधण्याचा संकल्प करण्यात आला होता.
कुरकुंडी राष्ट्रीय विद्यालयाचे माजी विद्यार्थी, शिक्षक, ग्रामस्थ या सर्वांनी दशक्रिया विधी च्या दिवशी आणि आज प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या कुटुंबाला आर्थिक मदत केली.आम्हीही आमचा खारीचा वाटा उचलला आहे.
या विधीच्या कार्यक्रमात शहीद जवान संभाजी ज्ञानेश्वर राळे यांच्या स्मरणार्थ सांस्कृतिक भवन बांधण्यासाठी जिल्हा परिषद निधीतून १० लक्ष रुपये देण्याचे मी जाहीर केले होते.
कोरोना संकट काळामुळे या आर्थिक वर्षात जिल्हा परिषदेकडून कोणतेही नवीन काम मंजूर करण्यात आलेले नसताना आणि विविध विकास कामांना आर्थिक तरतूद कमी असताना या सांस्कृतिक भावना साठी १० लक्ष रुपये मंजूर करण्याचा मी जिल्हा परिषदेमध्ये आग्रह धरला.
याकामी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, उपाध्यक्ष रणजित शिवतरे, बांधकाम सभापती प्रमोद काकडे ,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भारत शेंडगे यांनी सहकार्य केले.
काल रात्री ९ वाजेपर्यंत जिल्हा परिषदेमध्ये थांबून या सांस्कृतिक भवनाच्या १० लक्ष रुपये मंजुरीचे प्रशासकीय मान्यतेचे आदेश प्राप्त करून घेतले.
प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात राष्ट्रीय विद्यालय कुरकुंडी येथे शहीद जवान संभाजी राळे यांचे आई-वडील यांचे उपस्थित कुरकुंडी गावच्या ग्रामसेविका यांच्याकडे प्रशासकीय मान्यता आदेश सुपूर्त केला.
पुढील काही दिवसात सदर कामाची ई-निविदा करून तातडीने काम सुरू करण्याचा व वेळेत पूर्ण करण्याचा संकल्प आहे.
सदर सांस्कृतिक भवनाच्या माध्यमातून नव्या पिढीला देशसेवेची प्रेरणा मिळेल.