शहीद संभाजी राळे सांस्कृतिक भवन नव्या पिढीला देशसेवेसाठी प्रेरणा देईल.

शहीद संभाजी राळे सांस्कृतिक भवन नव्या पिढीला देशसेवेसाठी प्रेरणा देईल.

चाकण प्रतिनिधी
मु.पो.ग्रामीण.

शहीद संभाजी राळे सांस्कृतिक भवन नव्या पिढीला देशसेवेसाठी प्रेरणा देईल. असे काम जिल्हा परिषद निधीतून करणे हे मी माझे भाग्य समजतो असे विचार जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील यांनी कुरकुंडी येथे मांडले.
  कुरकुंडी गावचे सुपुत्र शहीद संभाजी ज्ञानेश्वर राळे हे देश सेवेत असताना ६ जानेवारी २०२१ रोजी शहीद झाले होते. त्यांच्या स्मरणार्थ सांस्कृतिक भवन उभारण्याची घोषणा शरद बुट्टे पाटील यांनी केली होती.
  त्यानुसार २१ लक्ष रुपये खर्च करून ४२०० स्क्वेअर फुटाचे सांस्कृतिक भवन बांधण्यात आले असून या भवनाला शहीद संभाजी ज्ञानेश्वर राळे सांस्कृतिक भवन असे नाव देण्यात आले आहे.
  आज स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने या सांस्कृतिक भवनाचे लोकार्पण शहीद संभाजी राळे यांच्या मातोश्री अरुणाताई आणि वडील ज्ञानेश्वर राळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील, अतुल देशमुख, अमोल पवार, शांताराम भोसले कैलास गाळव, रमेश राळे, माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष संतोष भोगाडे, विस्ताराधिकारी एसडी थोरात, बांधकाम विभागाचे शाखा अभियंता दीपक जंबुकर व श्री बाळासाहेब वाघमारे, पदाधिकारी
संजय रौंधळ, रोहित डावरे, दत्ता मांडेकर, सरपंच गौतम आवरी,मंगल भांगे,किरण पडवळ, यशवंत वाळुंज, महेंद्र कोळेकर, गणेश चौधरी, अर्जुन कडुसकर, संतोष कड, दिनेश लांडगे, निर्मला कोळेकर, वैशाली तांबे आदी पदाधिकारी यासह कुरकुंडी गावचे सरपंच सागर जावळे, उपसरपंच रंजना भोकसे, ग्रामपंचायत सदस्य काळूराम राळे, मनीषा हबडे, नितीन भोंकसे,सारिका भोंकसे ,सविता पडवळ, ग्रामसेविका सुनिता चौधरी यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
  यावेळी बुट्टे पाटील म्हणाले की आपण अनेक इमारती बांधल्या परंतु संभाजी राळे सांस्कृतिक भवन हे सर्वात समाधान देणारे काम आहे. आज माजी सैनिकांनी माझा केलेला सत्कार हा सर्वोच्च सन्मान आहे. माझ्या विनंतीवरून जिल्हा परिषदेचे पदाधिकारी व अधिकारी यांनी तातडीने निधी उपलब्ध करून दिला आणि ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी सहकारी केले म्हणून आठ महिन्याच्या आत मध्ये हे सांस्कृतिक भवन पूर्ण करण्यात आले आहे.
  आज देशसेवेसाठी सैन्यदलात देशप्रेमी तरुणांची गरज असून नव्या पिढीने संभाजी राळे यांच्यापासून प्रेरणा घेऊन सैन्यदलात दाखल व्हावे असे आवाहन देखील त्यांनी केले.
  यावेळी अतुल देशमुख ,अमोल पवार ,रमेश काळे, माजी सैनिक श्री दत्तात्रेय टोपे यांची भाषणे झाली.
   यावेळी तालुक्‍यातील 25 माजी सैनिकांचा विशेष सन्मान करण्यात आला.
  राष्ट्रीय विद्यालयाचे प्राध्यापक काकडे यांनी प्रास्ताविक केले. सलोनी आवळे हिने संभाजी राळे यांच्या जीवनावर भाषण केले तर कल्याणी भोकसे या विद्यार्थिनीने ए मेरे वतन के लोगो हे देशभक्तीपर गीत गाऊन उपस्थितांच्या डोळ्यात अश्रू आणले.
  बाळासाहेब घाटे यांनी सूत्रसंचालन केले तर अशोक भोकसे यांनी सर्वांचे आभार मानले.