शिवसेना मेळाव्यात खासदार मा. संजयजी राऊत यांना बैलगाड्याची प्रतिकृती भेट

शिवसेना मेळाव्यात खासदार मा. संजयजी राऊत यांना बैलगाड्याची प्रतिकृती भेट

निवृत्ती नाईकरे पाटील
मु.पौ.ग्रामीण

खेड तालुका शिवसेनेच्या वतीने आयोजित शिवसैनिकांच्या मेळाव्यामध्ये शिवसेना नेते, खासदार मा.संजयजी राऊत यांना शिवसेना उपतालुका प्रमुख संजयशेठ घनवट यांनी बैलगाड्याची प्रतिकृती भेट देत बैलगाडा शर्यतींवरील बंदी उठविण्याची मागणी केली.बैलगाडा शर्यत हा शेतकर्‍यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न असून,बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठी आपण प्रयत्न करावेत अशी आग्रही भुमिका संजय घनवट यांनी खासदार संजयजी राऊत यांच्या समोर तालुक्यातील बैलगाडा संघटना यांच्या वतीने मांडली.यावेळी संजूभाऊ घनवट युवा मंच खेड तालुका मिञ परिवार व बैलगाडा संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.