शेंडी -भंडारदरा येथे आदिवासी दिन साजरा

 

शेंडी -भंडारदरा येथे आदिवासी दिन साजरा

दशरथ खाडे,भंडारदरा

भंडारदरा(प्रतिनिधी)शेंडी(भंडारदरा)ता.अकोले
येथे विश्व आदिवासी दिन साजरा करण्यात आला.
प्रथमत: क्रांतीकारकांच्या प्रतिमेचेपूजन उपस्थित करण्यात आले.यावेळी आमदार डॉ.किरण लहामटे म्हणाले की आदिवासी समाज क्रांती कारकांनी दिलेल्या मार्गाने चालत आहेत.हा समाज द-याखो-यात राहत असुन
आपली परंपरा जपत आहे.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य अशोकराव भांगरे म्हणाले की आदिवासी बांधव आपली संस्कृती,परंपरा जपत आहे.सह्याद्री पर्वत रांगांमध्ये तो विखुरलेला असुन शांत संयमी स्वभाचा आहे.आपल्याकडे येणा-या सर्व समाजातील नागरिकांना तो प्रेमाची वागणुक देतो.त्यामुळे सर्व समाजाला जोडण्याचे काम आदिवासी बांधव करत आहेत.
यावेळी अकोले तालुक्याचे आमदार डॉ.किरण लहामटे,माजी जिल्हा परिषद सदस्य अशोकराव भांगरे,जिल्हा परिषद सदस्या सुनिताताई भांगरे,माजी जिल्हा परिषद सदस्य दिलिप भांगरे,अहमदनगर जिल्हा बँकेचे संचालक अमित भांगरे,विठ्ठल बापु भांगरे,मारुती खाडे,नवसु सोमा खाडे,प्राचार्य रोंगटे सर,हिरामण झडे,पुणे जिल्हा आदिवासी साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य दशरथ खाडे,आनंदा खाडे,बाळु दिघे,भास्कर खाडे आदि.उपस्थित होते.