शेतकर्‍यांच्या हितासाठी वेळोवेळी आवाज उठवणारे नेतृत्व म्हणजे अॅडव्होकेट अरुणभाऊ मुळुक!

शेतकर्‍यांच्या हितासाठी वेळोवेळी आवाज उठवणारे नेतृत्व म्हणजे अॅडव्होकेट अरुणभाऊ मुळुक!

निवृत्ती नाईकरे पाटील
मु.पो.ग्रामीण.

खेड तालुका वकील संघटनेचे माजी अध्यक्ष व राष्ट्रवादी काॅग्रेस लिगल सेलचे तालुका अध्यक्ष श्री अरूणभाऊ मुळुक यांचा सोमवार दि.१० रोजी अभिष्टचिंतन सोहळा!

त्यांच्या वाढदिवसानिमीत्त अरुणभाऊ मुळुक यांच्या स्वभावाचे विविध पैलु समोर मांडत असताना एक गोष्ट आवर्जुन सांगावीशी वाटते की खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील चासकमान परिसरातील एका शेतकरी कुंटुबातील हे व्यक्तीमत्व आपल्या कतृत्वाच्या जिवावर तालुक्याच्या ठिकाणी एक नामांकीत वकील म्हणुन काम करत असताना शेतकर्‍यांच्या समस्येविषयी नेहमी आवाज उठवत असतात.वेळोवेळी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांना नुकसानीला सामोरे जावे लागले यावेळी शेतकर्‍यांना योग्य नुकसान भरपाई मिळण्यासाठी अरूणभाऊंनी वेळोवेळी आवाज उठवला.आखरवाडी ता.खेड येथे चासकमान धरणाच्या डाव्या कालव्याच्या पाणी गळतीमुळे येथील अनेक शेतकर्‍यांची शेती नापीक झाली होती तर अनेकांची घरे धोक्यात आली होती.अरुणभाऊ यांनी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या प्रयत्नातून येथील अस्तारीकरणाचे काम पुर्ण करून घेतल्यामुळे येथील शेतकरी व नागरिकांनी समाधान व्यक्त केले.भागातील विकासकामांसाठी अरूणभाऊ मुळुक हे उपमुख्यमंञी अजीतदादा पवार खासदार डाॅ अमोल कोल्हे,आमदार दिलीपराव मोहिते पाटील व जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मलाताई पानसरे यांच्याकडे नेहमीच पाठपुरावा करत असतात.चासकमान परिसरातील नागरिकांकडून व मु.पो.ग्रामीणच्या सर्व टिमकडून अरूणभाऊ मुळुक यांना वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा!