शेतकर्‍यांच जगण मुश्कील झाल!अवकाळी पावसाच संकट पाठ सोडेना.

शेतकर्‍यांच जगण मुश्कील झाल!अवकाळी पावसाच संकट पाठ सोडेना.
चासकमान प्रतीनीधी-दर एक दिड महिन्याने अवकाळी पावसाचे आगमन होत असून,यामुळे शेती पिकवणे मुश्कील होवून बसले आहे.अगोदरच कोरोनामुळे एक वर्षे तोट्यात गेलेली शेती.अवकाळी पावसामुळे अजून तोट्यात चालली असून,शेतकर्‍यांच जगण मुश्कील होत चालले आहे.बदलत चाललेल्या हवामानामुळे शेतकर्‍यांपुढे आर्थिक संकट उभे रहात असून,शासनाने भरीव अनुदान देवून शेतकर्‍यांना या संकटातून बाहेर काढणे गरजेचे आहे.आज झालेल्या पावसामुळे कांदा,गहू,ज्वारी पिकांना मोठा फटका बसणार आहे.