श्री क्षेत्र गडदूबाई देवस्थान येथे दरड कोसळून पुलाचे संरक्षक कढडे तुटले.

श्री क्षेत्र गडदूबाई देवस्थान येथे दरड कोसळून पुलाचे संरक्षक कढडे तुटले.

निवृत्ती नाईकरे पाटील
मु.पो.ग्रामीण.

खेड तालुक्यातील प्रसिद्ध देवस्थान वाडा येथील श्री क्षेत्र गडदूबाई देवस्थान येथे दरड कोसळून संरक्षक पुलाचे कढडे तुटले आहे.लाखो भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेले गडदुदेवी देवस्थान परिसर भाविक भक्तांचे व पर्यटकांचे आकर्षण केंद्र बनलेले आहे.मंदिराशेजारीच डोंगरावरून पडणारा धबधबा असून,धबधब्यावरुन पडलेले पाणी जाण्यासाठी पुलाचे काम केलेले आहे.मुसळधार पावसामुळे धबधब्याच्या प्रवाहाबरोबर दरड कोसळून पुलाच्या संरक्षक कठड्यांचे नुकसान झाले आहे.जोरदार पाऊस सुरू असताना भाविक भक्तांनी व पर्यटकांनी धबधब्याच्या प्रवाहाजवळ जाणे टाळावे असे अहवान देवस्थान समितीने केले आहे.