संगिताताई नाईकरे यांची स्वाभिमानी संघर्ष सेनेच्या पश्चिम महाराष्ट्र विभागाच्या अध्यक्षपदी निवड.

संगिताताई नाईकरे यांची स्वाभिमानी संघर्ष सेनेच्या पश्चिम महाराष्ट्र विभागाच्या अध्यक्षपदी निवड.

राजगुरूनगर प्रतिनिधी
मु.पो.ग्रामीण.

संगिताताई नाईकरे यांनी गोरगरीब महिलांच्या प्रश्नासाठी अनेकवेळा आवाज उठवून न्याय देण्याचा प्रयत्न केला.त्यांच्या सामाजिक कामाची ओळख ही फक्त पुणे जिल्ह्यापुरती मर्यादित नसून त्यांना महाराष्ट्रभर सामाजिक कार्यकर्त्या म्हणुन ओळखल जातेय.यामुळे स्वाभिमानी संघर्ष सेनेने त्यांच्या सामाजिक कामाची दखल घेवून पश्चिम महाराष्ट्र विभागाच्या अध्यक्षपदी निवड केली आहे.संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदिपभाऊ सांगळे,महिला प्रदेश अध्यक्षा गिताजंलीताई भस्मे,युवक प्रदेशाध्यक्ष संतोषभैया खंदारे व प्रदेशाध्यक्ष विजय बडे यांनी त्यांना नियुक्तीचे पञ दिले.