संचितांकडून वंचितांकडे हीच खरी समाजसेवा- भैय्यासाहेब लांडगे.

संचितांकडून वंचितांकडे हीच खरी समाजसेवा-
भैय्यासाहेब लांडगे.

निवृत्ती नाईकरे पाटील
मु.पो.ग्रामीण.

समाजातील होतकरू व गरजू घटकांना समजावून घेऊन त्यांच्या जगण्याचा मार्ग सुखकर करणे हीच खरी समाजसेवा आहे,असे प्रतिपादन टाटा मोटर्स युनियन चे अध्यक्ष व महेशदादा स्पोर्ट्स फौंडेशनचे प्रमुख भैय्यासाहेब लांडगे यांनी केले आहे.यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना विविध प्रश्न विचारून त्यांच्याशी संवाद साधला.याप्रसंगी संतोष गाढवे
(सायकल उद्योजक) यांनी ही मनोगत व्यक्त केले.
खेड तालुक्यातील संस्कारक्षम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बारापाटी कमान या शाळेतील होतकरू व गरजू विद्यार्थ्याला आमदार महेशदादा लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त नामवंत
सॅनहोजे कंपनीची एक सायकल भेट देण्यात आली. एस एस सायकलिंग वर्ल्ड,भोसरी यांनी ही नवीन सायकल बनवून दिली आहे.
सायकल मित्र पुणे,अविरत श्रमदान भोसरी व महेशदादा स्पोर्ट्स फौंडेशनच्या मित्र परिवारा तर्फे हा समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आला.पर्यावरण रक्षणाचा संदेश देत सायकल मित्र परिवार व वरील संस्था गेल्या आठ ते दहा वर्षांपासून या क्षेत्रात दमदार कामगिरी करीत असून‌ प्रत्येक वर्षी पर्यावरण संवर्धनासाठी रिव्हर सायक्लोथोन, इंद्रायणी नदी किनारी स्वच्छता अभियान, वृक्षारोपण व जलपर्णी काढण्यासाठी सुद्धा मोहिमा राबविण्यात येत आहेत.
केवळ शहरातीलच नव्हे तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना यापुढील काळात देखील या संस्थांच्या माध्यमातून शैक्षणिक स्वरुपातील मदतकार्य केले जाणार आहे.
बारापाटी कमान शाळेतील कु.सुजल नारायण नाईकरे हा विद्यार्थी सुस्वभावी होतकरू व गरजू विद्यार्थी असून शाळेतील शिक्षकांनी या उपक्रमासाठी या गुणवंत विद्यार्थ्याची निवड केली आहे.या कार्यक्रमासाठी संतोष गाढवे,बापूसाहेब शिंदे, संदिप बढेकर, रोहित रणभोर, दत्ताशेठ नरवडे, सचिन असोले, बाळासाहेब जोशी काका व शंकरराव नाईकरे आदी मोजके मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संयोजन व सूत्रसंचालन शाळेचे
मुख्याध्यापक संजय नाईकरे यांनी केले तर आभार प्रदर्शन वैशाली लक्ष्मण मुके यांनी केले.