संजीवनी विकास मंच चाकण यांच्या वतीने कु. कृष्णांगी खांडेभराड हिच्या वाढदिवसानिमित्त शैक्षणिक साहित्य वाटप

संजीवनी विकास मंच चाकण यांच्या वतीने कु. कृष्णांगी खांडेभराड हिच्या वाढदिवसानिमित्त शैक्षणिक साहित्य वाटप

निवृत्ती नाईकरे पाटील
मु.पो.ग्रामीण.

रामभाऊ म्हाळगी माध्य व उच्च माध्यमिक विद्यालय कडूस येथे मुलगी कृष्णागी हिच्या वाढदिवसानिमित्त विद्यालयात विद्यार्थ्याना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. हुतात्मा राजगुरू यांच्या प्रतिमेचे पुजन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. विद्यार्थ्याना शैक्षणिक प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या .रामभाऊ म्हाळगी विद्यालयाच्या वतीने कृष्णांगी हिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या .या कार्यक्रमाप्रसंगी उद्योजक, संजीवनी विकास मंच चे अध्यक्ष आदरणीय श्री दत्ताशेठ खांडेभराड, सचिव श्री सुनिल कड ,पर्यवेक्षक अविनाश काळोखे, अनिल पोटे , आजिनाथ केदार ,विष्णुपंत पाटील , बबन डांगले उपस्थित होते कार्यक्रमाचे नियोजन खेड तालुका क्रीडा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष श्री रामदास रेटवडे व शिक्षक श्री प्रविण काळे यांनी केले .