संभाळण्याची लायकी नसेल तर जन्मच कशाला देता!ह्रदयद्रावक!

संभाळण्याची लायकी नसेल तर जन्मच कशाला देता!ह्रदयद्रावक!

राजगुरूनगर प्रतिनिधी
मु.पो.ग्रामीण.

कोये (ता.खेड)येथे गावालगत नुकतेच जन्मलेले स्त्री जातीचे नवजात अर्भक सोडल्याचा धक्कादायक प्रकार मध्यराञीच्या सुमारास घडला आहे. बाजुलाच असणाऱ्या एका महिलेला बाळाचा आवाज आल्यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने बाळाला प्राथमिक उपचारासाठी पाईट येथील प्राथमिक आरोग्य केंद्र दाखल करण्यात आले. बाळाचे वजन 3 किलो असुन नुकतेच जन्मलेले आहे. त्याच्यावर प्राथमिक उपचार करुन चाकण पोलीसांच्या मदतीने बाळाला पुढील उपचारासाठी पुण्याला पाठविण्यात आले असल्याचे डॉक्टरांनी सांगीतले

‘स्री जातीचे नवजात अर्भक’ रस्त्यावर फेकलेल्या अवस्थेत आढळली. काही तासांपूर्वीच जन्मलेली ही ‘स्री जातीचे नवजात अर्भक सुखरूप असली, तरी तिला निर्दयपणे गावाच्या बाजुला निर्जन ठिकाणी फेकल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.