सर्व संकटांमधे खंबीरपणे ऊभी राहते ती फक्त आई-आमदार दिलीप मोहिते.

सर्व संकटांमधे खंबीरपणे ऊभी राहते ती फक्त आई-आमदार दिलीप मोहिते पाटील.

आईच्या स्मरणार्थ दोन भावांनी बांधलेल्या प्रवेशद्वाराचा पापळवाडी गावात लोकार्पण सोहळा.

चासकमान प्रतिनिधी
मु.पो.ग्रामीण.

(काही निवडक, काही सुखद)
चासकमान पंचक्रोशीतील पापळवाडी गावातील दोन सख्ख्या भावांनी आपल्या समाजाभिमुख कार्याचा आदर्श उभा करीत आईच्या स्मरणार्थ गावासाठी प्रवेशद्वार बांधून दिले आहे. कै.सौ.भिमाबाई मारूती शिंदे यांनी आयुष्यभर सन्मार्गाने जगत खडतर परिस्थितीतही आपल्या मुलांना उत्तम शिक्षण देऊन उत्तम संस्कार दिले.
एक मुलगा शिक्षक तर दुसरा उच्च शिक्षण घेऊनही शेती व दुग्ध व्यवसाय क्षेत्रात यशस्वीपणे कार्य करत आहे.
आईच्या अकाली जाण्यानंतर
आदर्श शिक्षक बाबाजी शिंदे सौ अनिता शिंदे व उद्योजक राजू शिंदे यांच्या कुटुंबातील सर्व बहिणी भाऊ भावजया व संबंधितांनी वडील मारुती शिंदे यांच्या इच्छेप्रमाणे गावासाठी प्रवेशद्वार देण्याचे ठरवले.व निर्धारित वेळेत आकर्षक स्वागत कमान तयार करून आज तिचा लोकार्पण सोहळा साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी तालुक्यातील लोकप्रिय आमदार दिलीप मोहिते पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.यावेळी शिंदे परिवाराच्या विधायक कामाचे कौतुक करताना त्यांनी मनाने खचून आत्महत्या कलणा-या वैफल्यग्रस्त शेतक-यांमध्ये एकूण आकडेवारीच्या एक टक्काही महिलांच्या आत्महत्या नसल्याचे नमूद केले.मुळातच कोणत्याही संकटकाळी पुरुषांपेक्षा महिलाच अधिक खंबीरपणे उभ्या राहात असल्याचे अनेक दाखले त्यांनी दिले.घरातील कर्ता सवरता पुरूष गेला तरी आपल्या मुलाबाळांसाठी आईच खंबीरपणे उभी राहते.व स्वतः लाख खस्ता खात मुलाला आयुष्यभर पुरेल एवढी शिदोरी उभी करण्यासाठी स्वतःचे आयुष्य खर्ची घालते.
या हृदयस्पर्शी सोहळ्यासाठी
राजगुरुनगर सहकारी बँकेच्या
माजी अध्यक्षा विजयाताई शिंदे,जिल्हा परिषद सदस्या तनुजाताई घनवट यांनी मनोगत व्यक्त केले.जिल्हा परिषद सदस्य बाबाजी शेठ काळे यांनी देखील कार्यक्रम स्थळी भेट देऊन या कामाचे कौतुक केले.
या मातोश्रीं च्या स्मरणार्थ उभारण्यात येणा-या सार्वजनिक वाचनालयासाठी पंचायत समिती च्या वतीने विशेष तरतूद केली आहे अशी माहिती पंचायत समिती खेडचे माजी सभापती अंकुशशेठ राक्षे यांनी दिली असून या वाचनालयाच्या माध्यमातून ही या मातेच्या स्मृतींचे जतन करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमासाठी
खेड तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.यामध्ये
स्वामी शिवदत्त महाराज चास, कडूस येथील उद्योजक प्रतापशेठ ढमाले, पापळवाडीचे सरपंच पूनम शिंदे उपसरपंच रेणुका शिंदे प्रकाश चव्हाण किसन शिंदे व सर्व सदस्य तसेच बहिरवाडीचे सरपंच जगन्नाथ राक्षे,पोलिस पाटील संदिप भागडे कमान बारापाटी शाळेचे आदर्श मुख्याध्यापक संजय नाईकरे यांचे सह दगडू शिंदे,रंगनाथ चव्हाण सतीश चव्हाण नंदू शिंदे तसेच तालुक्यातील विविध प्राथमिक शिक्षक संघटनांचे नेते व शिक्षक प्रतिनिधी तसेच पाबळ व रानमळा येथील ग्रामस्थ व चासकमान पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.उपस्थित सर्व पाहुण्यांसाठी शिंदे परिवाराच्या वतीने स्नेहभोजन देण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राथमिक शिक्षक तुषार वाटेकर यांनी केले तर आत्माराम शिंदे यांनी आभार मानले.