सायकल वारी जगात भारी…सायकल चालवा पर्यावरण वाचवा-डाॅ.निलेश लोंढे

सायकल वारी जगात भारी…सायकल चालवा पर्यावरण वाचवा-डाॅ.निलेश लोंढे

‘सायकल मित्र पुणे यांच्या पुणे-भिमाशंकर राईडचे लाईफ जागतिक पर्यावरण संस्थेतर्फे चासकमान येथे भव्य स्वागत…’

निवृत्ती नाईकरे पाटील
मु.पो.ग्रामीण.

मानवी जीवनात आजही सायकलचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.
नवनवीन वाहनांच्या भाऊगर्दीत ही सायकल आजही आपले अस्तित्व टिकवून आहे.मानवी आरोग्यासाठी तसेच निसर्ग व पर्यावरणाचे रक्षण होण्यासाठी व विशेषतः आपल्या शारीरिक आणि मानसिक संतुलनासाठी सुद्धा सायकल सवारी खूप महत्वाची असते.
असे प्रतिपादन भोसरी(पुणे) येथील डाॅ.निलेश लोंढे यांनी केले आहे.
हाॅकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या 116 व्या जन्मदिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय क्रीडा दिनी सायकल मित्र पुणे व लाईफ जागतिक पर्यावरण संस्था चासकमान यांनी संयुक्त पणे
*सायकल वारी जगात भारी*
हा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचा संकल्प केला आहे.
आज सकाळी पुणे येथून सुरू झालेल्या या पुणे-भिमाशंकर सायकल राईडचे सकाळी आठ वाजता चासकमान ता. खेड येथे आगमन झाले.याठिकाणी पर्यावरण पूरक शैक्षणिक साहित्य निर्मितीचा राज्यस्तरीय पुरस्कार विजेते शिक्षक व बारापाटी कमान शाळेचे मुख्याध्यापक संजय नाईकरे यांनी सर्व सायकल स्वारांचे स्वागत केले.यावेळी पावणेदोन लाख रूपयांची ‘स्लीम सायकल’ चासमधील नागरिकांसाठी औत्सुक्याचा विषय बनून राहिली होती.
लाईफ जागतिक पर्यावरण संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण
पुणे जिल्ह्यातील जैवविविधता व पर्यावरण रक्षणा सह ग्रामीण भागातील सुंदर निसर्ग संपदा अबाधित राखण्यासाठी सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती सायकल मित्र पुणे यांना देण्यात आली.
या उपक्रमात बापुसाहेब शिंदे, सुनिल सैंदाणे,संतोषराव गाढवे,संदिप बढेकर,श्री भापकर सर, सचिन असवले,दत्ता नरवडे
व डाॅ. निलेश लोंढे आदी मान्यवरांनी सहभाग घेतला.सायकल मित्र भोसरी युनिट चे आधारस्तंभ व युवा नेते भैयासाहेब लांडगे यांनी या पर्यावरण रॅलीला शुभेच्छा दिल्या.