साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या १०१ व्या जयंतीनिमित्त कडूस येथे लाऊड स्पिकरभेट.

साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या १०१ व्या जयंतीनिमित्त कडूस येथे लाऊड स्पिकरभेट.

निवृत्ती नाईकरे पाटील
मु.पो.ग्रामीण.

दिनांक एक ऑगस्ट २०२१ रोजी कडूस नगरीमध्ये साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या १०१ व्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमांमध्ये मातंग समाजासाठी लाऊड स्पीकर सेट भेट देण्यात आला. ही भेट माननीय जिल्हा परिषद अध्यक्ष सौ. निर्मलाताई पानसरे यांच्या निधीतून देण्यात आली आहे. या जयंती च्या कार्यक्रमा निमित्त मातंग बांधवांसह हा उत्सव साजरा करण्यासाठी कडूस नगरीतील सौ. कांचन प्रताप ढमाले(जिल्हा उपाध्यक्ष महिला राष्ट्रवादी काँग्रेस) सरपंच निवृत्तीशेठ नेहरे,उपसरपंच कैलासराव मुसळे,ग्रामपंचायत सदस्य बारकूशेठ गायकवाड सर,गणेशशेठ मंडलिक,लतानानी ढमाले,अनिकेत धायबर,रंजना पानमंद यांच्यासह उद्योजक प्रतापशेठ ढमाले,शशिकिरण कालेकर,बबलूभाई तुरुक,अभिजीत शेंडे सर,बाळूतात्या धायबर,रवींद्र गायकवाड,शकूरभाई तुरुक,भानुदास बंदावणे,मारुती जाधव,आनंदराव पानमंद,शशिकला ढमाले,सुलभाताई चिपडे,भावनाताई शेंडे,अरुणाताई ढमाले,सुरेखाताई कड तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व कडूस ग्रामस्थ उपस्थित होते.
जयंतीच्या कार्यक्रमाचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी या नात्याने लॉकडाऊन च्या काळामध्ये रोजगार बुडालेल्या मातंग समाजातील काही गरीब उपेक्षित कुटुंबांना किराणा किट चे वाटप कडूस ग्रामपंचायत व राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी कडूस यांच्यावतीने करण्यात आले कार्यक्रमामध्ये सर्व मान्यवरांनी आपापले विचार मांडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपसरपंच कैलासराव मुसळे यांनी केले व आभार ग्रामपंचायत सदस्य बारकूशेठ गायकवाड सर यांनी मानले.