सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील आरोपींपैकी एक संतोष जाधवला अखेर पुणे ग्रामीण पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील आरोपींपैकी एक संतोष जाधवला अखेर पुणे ग्रामीण पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

पुणे प्रतिनिधी
मु.पो.ग्रामीण.

सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील आरोपींपैकी एक संतोष जाधवला अखेर पुणे ग्रामीण पोलिसांनी बेड्या ठोकल्या. गुजरात राज्यातील कच्छ मधून आरोपी संतोष याला अटक करण्यात आली आहे. संतोष सोबत त्याच्या सूर्यवंशी नावाच्या आणखी एका साथीदारालाही पोलिसांनी अटक केली आहे. दोघांनाही रात्री 12 वाजता न्यायाधीशांसमोर हजर करण्यात आलं असता त्यांना २० जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

मात्र संतोष जाधवची चर्चा तेव्हापासून सुरु झाली जेव्हा पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्या प्रकरणात त्याच नावं घेण्यात आलं. त्याचबरोबर सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिल्याबद्दल देखील त्याचं नाव घेण्यात आलं. त्यामुळे पंजाब, दिल्ली आणि मुंबई पोलीसांकडून त्याचा शोध सुरु करण्यात आला.

संतोष जाधव हा पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील मंचरचा राहणारा असुन दीड वर्षांपासून तो राण्या बाणखेले नावाच्या गुडांचा खुन केल्यापासून फरार होता. त्यानंतर तो उत्तर भारतातील लॉरेन्स बिष्णोई टोळीत सामील झाला होता. या टोळीकडून खंडणी वसूल करण्यासाठी काही दिवसांपुर्वी त्याने राजस्थानमधील गंगापूर शहरातील एका व्यापाऱ्यांवर गोळीबार केला होता.

त्यासाठी या वेगवगेळ्या राज्यातील पोलीस पुण्यात तळ ठोकून आहेत. मात्र पुणे ग्रामीण पोलीसांच्या पथकाने गुजरातमधील कच्छ मधुन त्याला अटक करण्यात यश मिळवलं आहे. काही दिवसांपुर्वी पुणे ग्रामीण पोलिसांनी सौरभ महाकाळ उर्फ सिद्धेश कांबळे या त्याच्या साथीदाराला ही अटक केली होती.