सेवा की मेवा!एका तालुक्यातील फेसबुक्या समाजसेवकावर गुन्हे दाखल!

सेवा की मेवा!एका तालुक्यातील फेसबुक्या समाजसेवकावर गुन्हे दाखल!

निवृत्ती नाईकरे पाटील
मु.पो.ग्रामीण.

सामाजिक संस्था स्थापन करून.समाजसेवेचा बुरखा पांघरून सुरवात करायची.सुरवात करताना सोशल मिडियावर लाइव्ह करायचे!अस दाखवायच की मी जगावेगळच काही तरी करतोय.हळुहळु लोकांना पण वाटायला लागतय की हा नक्कीच काही तरी करतोय असा समज होवून बसतो.मग सुरू होतो मदतीचा वेग त्यात भर म्हणुन हा बाबा त्यांना पण लाईव्ह दाखवून आपली मदतीची साखळी मजबुत करत असतो.त्यात पण या बाबाचे पोट भरले नाही म्हणुन स्वताच्या तालुक्यातील एका व्यवसायिकाकडे खंडणी मागण्याची मजल गेली.आणि अखेर त्याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झाला.काल म्हणे त्याच्या स्वताच्या पत्नीनेच त्याच्यावर गंभीर आरोप केले असून,त्याच्या विरोधात फिर्याद दाखल केली आहे.अनेक सामाजिक संस्था चांगल काम करत आहेत कारण त्यांच संघटन आहे पण एखादया संस्थेचा एकटाच सर्वेसर्वा असला की समजायच पाणी कुठे तरी मुरतेय.