सैन्य दलातील जवानांच्या निरपेक्ष सेवेमुळे आपले जीवन सुरक्षित-सतीश गुरव पोलिस निरीक्षक खेड

सैन्य दलातील जवानांच्या निरपेक्ष सेवेमुळे आपले जीवन सुरक्षित-सतीश गुरव पोलिस निरीक्षक खेड

चासकमान प्रतिनिधी
मु.पो.ग्रामीण.

चासकमान येथील हुतात्मा विलास बाजीराव मुळूक यांना आज त्यांच्या शहीद दिनानिमित्त मानवंदना देऊन अभिवादन करण्यात आले.श्रीलंकेतील जाफना बेटावर भारतीय शांती सेनेत कर्तव्य बजावत असताना त्यांना वीरमरण आले. त्यांच्या हौतात्म्यानंतर चासकमान परिसरातील युवक व देशप्रेमी ग्रामस्थांनी एकत्र येऊन हुतात्मा विलास बाजीराव मुळूक स्मारकाची उभारणी केली.याठिकाणी एक शहीद स्तंभ देखील उभारण्यात आला आहे.
मात्र काही काळानंतर हे स्मारक दुर्लक्षित झाले व त्याची दुरावस्था झाली.ही बाब लक्षात घेऊन भारतीय सैन्य दलातील सेवानिवृत्त जवान ज्ञानेश्वर मुळूक यांनी आपल्या युवा मित्रांना समवेत घेऊन स्मारकाच्या इमारतीची आवश्यक ती दुरूस्ती केली व रंगरंगोटी करून स्मारकाला ऊर्जितावस्था प्राप्त करून दिली.त्यानंतर अल्पावधीत नियोजन करून शानदार अभिवादन समारंभ घडवून आणला.
यावेळी चास कमान आखरवाडी पापळवाडी मिरजेवाडी घनवटवाडी गुंजवठा व कडवे कान्हेवाडीसह विविध गावांतील अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी राष्ट्रीय ध्वज तिरंगा फडकविण्यात आला.उपस्थित सर्व मान्यवरांनी स्मृतिस्तंभावर पुष्प चक्र अर्पण करून आदरांजली वाहिली.
त्यानंतरच्या अभिवादन सभेत बोलताना खेड पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक सतीश गुरव यांनी सभेला संबोधित केले.व भारतीय सैन्य दलाबद्दल गौरवोद्गार काढले.
कार्यक्रम स्थळी हुतात्मा विलास बाजीराव मुळूक यांच्या मातोश्री, खेड तालुक्यातील पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, सर्व ग्रामपंचायतीं चे सदस्य, चास ग्रामपंचायत… माजी सैनिक, कृषी विभाग, वनविभाग, शिक्षण विभाग, आरोग्य विभाग, युवावर्ग व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.सूत्रसंचालन विनायक मुळूक यांनी केले तर मुख्याध्यापक संजय नाईकरे यांनी आभार मानले.