सोशल मिडियावर पावसावरच मिम्सचा पाऊस पण शेतकर्‍यांची झोपच उडाली त्याच काय!

सोशल मिडियावर पावसावरच मिम्सचा पाऊस पण शेतकर्‍यांची झोपच उडाली त्याच काय!

 

निवृत्ती नाईकरे पाटील
मु.पो.ग्रामीण.

छञी ठेवून स्वेटर काढला!पाऊस म्हणाला मी पुन्हा येईल….!आज पासून शाळा सुरू होणार अस सांगीतल तर…पावसाला वाटल पावसाळाच सुरू झाला……!कांदे आणी रोपांना भावपुर्ण श्रद्धांजली…गेली दोन महिन्यापासून पिळ रोग आणी करपा रोगामुळे कांदे कोमात गेले होते…पण आज तीव्र झटक्याने दुखद निधन झाले-शोकाकुल सर्व कांदा उत्पादक!अश्या प्रकारे सोशल मिडियावर पावसाचे मीम्स व्हायरल होत आहेत!पण याच पावसामुळे शेतकर्‍यांची पुरती झोप उडाली आहे.दोन महिन्यापुर्वी लावलेले कांदा पिकाची अवस्था काय आणी आत्ता लावलेल्या कांदा पिकाची अवस्था काय?शेतकर्‍यांची अवस्था न घरका…ना घाटका……!अगोदर लावलेले कांदा पिक पिळ रोग व करपा रोगामुळे गेल्यात जमा आहे.कांदाच काय तर भाजीपाला पिके व तरकारी पिकांची अवस्था सुद्धा खराबच आहे.एका बाजूला वीज बिलांचा तगादा आणी गेली दोन वर्षे दर महिन्याला पडणार्‍या सततच्या पावसामुळे वाया जाणारी पिके यात शेतकरी वर्गाचा ताळमेळ काही बसतच नाही.हवामानाच्या सततच्या बदलामुळे शेतात नक्की पिक तरी काय घ्यायचे असा प्रश्न शेतकरी वर्गाला पडला आहे.