सोशल मिडीयावर सगळीकडे मशाल आणी फक्त मशालच!!

सोशल मिडीयावर सगळीकडे मशाल आणी फक्त मशालच!!

राजगुरूनगर प्रतिनिधी
मु.पो.ग्रामीण.

तात्पुरता का होईना अनेक दिवसांचा शिवसेनेच्या नावाचा आणि चिन्हाचा वाद निवडणूक आयोगाने निकाली काढला आहे.

निवडणूक आयोगाने आता उद्धव ठाकरे  यांच्या गटाला मशाल हे चिन्ह दिलं आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव तर उद्धव ठाकरेंच्या गटाला ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे नाव देण्यात आलं आहे. त्यामुळे आता दोन्ही गटांच्या नावाचा वाद मिटला असला तरी शिंदे यांच्या गटाच्या चिन्हाचा वाद मिटला नाहीये.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाला मशाल चिन्ह भेटले आहे आणी सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झाले आहे.पुढे धनुष्यबाण या चिन्हावर न्यायालयातून काहीही निकाल आला तरी मशाल चिन्ह हे ओळखण्यास सोपे असल्यामुळे हे चिन्ह मतदारापर्यंत पोहचवण्यासाठी सोपे झाले आहे.
कालपासून उषःकाल होता होता,,, काळरात्र झाली,,,, आरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली,,,,,,या जुन्या गीताच्या चालीवर असंख्य शिवसैनिकांनी मशालीचे स्टेट्स ठेवले आहेत.