हुतात्मा राजगुरु सोशल फाऊंडेशन, राजगुरुनगर” या संस्थेला “कोरोना योद्धा”पुरस्कार.

हुतात्मा राजगुरु सोशल फाऊंडेशन, राजगुरुनगर” या संस्थेला “कोरोना योद्धा”पुरस्कार.

निवृत्ती नाईकरे पाटील
मु.पो.ग्रामीण.

“खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती” च्या वतीने आज मासिक मिटींगच्या निमित्ताने सभापती, उपसभापती व सर्व संचालकांच्या वतीने खेड तालुक्यातील अग्रगण्य असलेल्या सामाजिक संस्थेला म्हणजेच “हुतात्मा राजगुरु सोशल फाऊंडेशन, राजगुरुनगर” या संस्थेला “कोरोना योद्धा” पुरस्कार देऊन सन्मानित कारण्यात आले.

कोरोना काळात केलेल्या व विविध सामाजिक कार्याचा गौरव विद्यमान सभापती विनायक घुमटकर व सर्व संचालकांनी केला. त्याचप्रमाणे आज दि. ८ ऑगस्ट २०२१ रोजी असलेल्या मासिक सभेचे सर्व सदस्यांचे मानधन “१४,६४६ रुपये” हुतात्मा राजगुरु सोशल फाऊंडेशन कडे सामाजिक कार्यासाठी रोख जमा केले.

खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, उपसभापती व सर्व संचालकांचे तसेच फाऊंडेशनला वेळोवेळी सहकार्य करणाऱ्या सर्व दानशूर व्यक्तींना हुतात्मा राजगुरु सोशल फाऊंडेशन च्यावतीने मनापासून खूप खूप आभार..