हुतात्मा राजगुरूंची जन्मभूमी हे राष्ट्रभक्तीचे प्रेरणास्थान…-अनिल कुमार(ए.डी.जी.सी.आय.एस.एफ)

हुतात्मा राजगुरूंची जन्मभूमी हे राष्ट्रभक्तीचे प्रेरणास्थान…-अनिल कुमार(ए.डी.जी.सी.आय.एस.एफ)

राजगुरूनगर प्रतिनिधी
मु.पो.ग्रामीण

हुतात्मा राजगुरु यांच्या जन्मस्थळावर भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव समारंभ – सी.आय.एस.एफ.च्या साऊथ आणि वेस्ट सेक्टरकडून मानवंदना.

राजगुरूनगर ता खेड.
येथील हुतात्मा शिवराम हरि राजगुरू यांच्या जन्मस्थळावर भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त फ्लॅग आॅफ सिरेमनी आॅफ सायकल रॅली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सी.आय.एस.एफ. व हुतात्मा राजगुरू स्मारक समिती यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.येरवडा ते दिल्ली असा तब्बल एक हजार सातशे किलोमीटर चा सायकल प्रवास या रॅलीदरम्यान पूर्ण केला जाणार असून
ही सायकल रॅली येरवड मध्यवर्ती कारागृह पुणे येथून शनिवार दिनांक चार सप्टेंबर रोजी सुरू करण्यात आली.पुणे ते दिल्ली असा १७०० किलोमिटर प्रवास करताना आज रविवार दि.५ सप्टेंबर रोजी राजगुरुनगर येथील हुतात्मा राजगुरू राष्ट्रीय स्मारक, राजगुरूवाडा येथे सी.आय.एस.एफ.यांच्या प्रमुखांनी व राजगुरूनगर मधील मान्यवरांनी सायकल रॅलीला हिरवा झेंडा दाखवला. या कार्यक्रमानिमीत्त हुतात्मा राजगुरू यांच्या जन्मस्थळावर भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमीत्त शानदार कार्यक्रम घेण्यात आला.यानिमीत्त सी.आय.एस.एफ.च्या जवांनानी विविध देशभक्तीपर कार्यक्रम, गीते व कला सादर केल्या.हुतात्मा राजगुरु स्मारक समितीच्या वतीने
अतिथींना राजगुरु भगतसिंग व सुखदेव यांचे म्यूरल देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी सी आय एस एफ च्या दोन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून पर्यावरण रक्षणाचा संदेश ही देण्यात आला.हुतात्मा राजगुरु स्मारक समितीचे अध्यक्ष अतुल देशमुख यांनी हुतात्मा राजगुरू यांचा आपल्या जीवनपट मनोगतातून व्यक्त केला.यानंतर सायकल रॅलीला उपस्थित मान्यवरांनी हिरवा झेंडा दाखवला.
यावेळी सी.आय.एस.एफ.चे ए.डि.जी. श्री अनिलकुमार, आय.जी. श्री के.एन.ञिपाठी डि.आय.जी.श्री मनोजकुमार आय.पी,एस, ए.आय.जी. निती मित्तल,ए.आय.जी.
श्री लज्जाराम,कमांन्डट श्री सुमन कुमार, इनस्पेक्टर सुनिल जाधव,इनस्पेक्टर विक्रम, इनस्पेक्टर बी.एस गुजर,सब इनस्पेक्टर सतीश काशिनाथ नाईकरे हे मान्यवर उपस्थित होते.
तसेच हुतात्मा राजगुरुंचे वंशज धैर्यशिल राजगुरु,सत्यशिल राजगुरु व प्रशांत राजगुरु यांचेसह राजगुरुनगर शहरातील अनेक मान्यवर उपस्थित होते.सी आय एस एफ च्या आशुतोष सिंग व मिनु लांबा यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.तर मुख्याध्यापक संजय नाईकरे यांनी आभार मानले.
हुतात्मा राजगुरु स्मारक समितीचे अध्यक्ष अतुल देशमुख,सचिव सुशिल मांजरे,विठ्ठल पाचारणे,संजय नाईकरे,बाळासाहेब कहाणे,नितीन शहा,सचिन भंडारी,वर्षा चासकर,प्रिया भंडारी’सुदाम कराळे,अजय थिगळे,प्रविण वायकर, अशोक कोरडे, योगेश गायकवाड, अरुण गुंडाळ यांचेसह मोठ्या संख्येने युवा कार्यकर्ते उपस्थित होते.