हुतात्मा राजगुरू जन्मस्थळावर भारतीय स्वातंञ्याचा अमृतमहोत्सव कार्यक्रम केंद्रिय औदयोदीक सुरक्षा बल यांच्याकडून साजरा.

हुतात्मा राजगुरू जन्मस्थळावर भारतीय स्वातंञ्याचा अमृतमहोत्सव कार्यक्रम केंद्रिय औदयोदीक सुरक्षा बल यांच्याकडून साजरा.

निवृत्ती नाईकरे पाटील
मु.पो.ग्रामीण.

हुतात्मा राजगुरू जन्मस्थळावर भारतीय स्वातंञ्याचा अमृतमहोत्सवानिमीत्त फ्लॅग आॅफ सिरेमनी आॅफ सायकल रॅली या कार्यक्रमाचे आयोजन केंद्रिय औदयोदीक सुरक्षा बल व हुतात्मा राजगूरू स्मारक समिती यांच्यावतीने करण्यात आले होते.
ही सायकल रॅली पुणे ते दिल्ली असा १७०० किलोमिटर प्रवास करणार असून,पुणे येथील येरवडा कारागृह येथे शनिवार दि. ४ रोजी या रॅलीला सुरवात झाली असून,रविवार दि.५ रोजी हुतात्मा राजगुरू राष्ट्रीय स्मारक राजगुरूवाडा येथे केंद्रीय औदयोगीक सुरक्षा बल यांच्या सायकल रॅलीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला.या कार्यक्रमानिमीत्त हुतात्मा राजगुरू यांच्या जन्मस्थळावर भारतीय स्वातंञ्याचा अमृतमहोत्सवानिमीत्त कार्यक्रम घेण्यात आला.यानिमीत्त केंद्रीय औदयोगीक सुरक्षा बलाच्या जवांनानी विविध देशभक्तीपर कला सादर केल्या.हुतात्मा राजगुरू स्मारक समितीचे अध्यक्ष अतुल देशमुख यांनी हुतात्मा राजगुरू यांचा जीवनपट मनोगतातून व्यक्त केला.यानंतर सायकल रॅलीला उपस्थित मान्यवरांनी हिरवा झेंडा दाखवला.

यावेळी केंद्रीय औदयोगीक सुरक्षा बलाचे ADG श्री अनिलकुमार, CISFचे IG श्री के.एन.ञिपाठीCISF चे DIG श्री मनोजकुमार IPS, CISF च्या AIG निती मित्तल,CISF चे AIG श्री लज्जाराम,CISF चे कमांन्डट श्री सुमन Kumar, इनस्पेक्टर सुनिल जाधव,इनस्पेक्टर विक्रम, इनस्पेक्टर बी.एस गुजर, सब इनस्पेक्टर सतीष नाईकरे हे मान्यवर उपस्थित होते.

हुतात्मा राजगुरूंचे वंक्षज धैर्यशिल राजगुरू,सत्यशिल राजगुरू,प्रशांत राजगुरू यासह
हुतात्मा राजगुरू स्मारक समितीचे अध्यक्ष अतुल देशमुख,सुशिल मांजरे,विठ्ठल पाचारणे,मुख्यादयापक संजय नाईकरे, बाळासाहेब कहाणे,नितीन शहा,सचिन भंडारी,वर्षा चासकर,प्रिया भंडारी व सर्व सहकारी उपस्थित होते.