हुतात्मा राजगुरू जन्मस्थळावर एकदिवसीय चक्री किर्तन महोत्सव सपंन्न! क्रांतिकारकांच्या जीवनावर आधारित विशेष कीर्तने!

हुतात्मा राजगुरू जन्मस्थळावर एकदिवसीय चक्री किर्तन महोत्सव सपंन्न! क्रांतिकारकांच्या जीवनावर आधारित विशेष कीर्तने!

राजगुरूनगर प्रतिनिधी
मु.पो.ग्रामीण!

 

भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील थोर व महान क्रांतिकारक शहीद राजगुरु यांच्या जन्म स्थळी राजगुरुनगर येथे , स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त… रविवार दिनांक १३ मार्च रोजी क्रांतिकारकांच्या जीवनावर आधारित एकदिवसीय चक्री कीर्तन महोत्सव कार्यक्रम सकाळी १० ते दुपारी ४ या दरम्यान सलग पार पडला…!
श्री. महागणेश अधिष्ठान विश्वस्त न्यास यांच्या वतीने ” राष्ट्रधर्म जागरण अभियान ” अंतर्गत परम पूज्य शक्तिपात महायोग , पिठाधिश्र्वर महंत व राष्ट्र भूषण राष्ट्रीय कीर्तनकार , श्रीमान मोरेश्वर जोशी चऱ्होलीकर महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली क्रांतिकारकांच्या जीवनावर आधारित विशेष कीर्तने झाली…!!
यामध्ये प्रामुख्याने ह.भ.प. प्रा. डॉ.उदय पाटकर , माधव फळणीकर ,श्रीकृष्ण पुरोहित , सौ. स्मिता देशपांडे . मयुरी घेवारी , वासंती जोशी ,ज्योति घोडके ,नीलम शिंदे ,वत्सला शिर्के ,वंदना कापरे ,वर्षा गोरे , त्रिवेणी शिंगाडे , मंगला आवटे व रंगनाथ कुलकर्णी यांची कीर्तने झाली ,
तरुण पिढीमध्ये व अज्ञान समजा मध्ये क्रांतिकारकांचे स्वातंत्र्यासाठी झालेले बलिदान , त्याग यांचे महत्व समजावे , तसेच तरुणांमध्ये व सर्व प्रकारच्या घटकांमध्ये राष्ट्रभक्ती जागृत करण्यासाठी ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते , वैशिष्ट्ये म्हणजे क्रांतिकारकांच्या जीवनावर आधारित पहिल्यांदाच कीर्तन महोत्सव कार्यक्रम , हुतात्मा राजगुरू यांचा जन्म स्थळी पार पडलेला आहे .
यावेळी महंत मोरेश्वर जोशी यांनी हुतात्मा राजगुरू स्मारक समिती ला २७० क्रांतिकारकांची पुस्तके भेट दिली .त्यावेळी विठ्ठल पाचर्णे लिखित ” राष्ट्रनायक ” हे हिंदी पुस्तक , सत्यशील राजगुरु यांच्या हस्ते कीर्तनकार महाराजांना देण्यात आली . या पवित्र पावन भूमीत आल्याचे मोठे समाधान मिळते तसेच साधनेची अध्यात्मिक अनुभूती येत असल्याचे मत , महंत मोरेश्वर जोशी यांनी सांगितले ,
यावेळी राजगुरु यांचे वशंज सत्यशील राजगुरु यांनी कीर्तनकार महाराजांचे स्वागत केले , त्याप्रसंगी राजगुरु स्मारक समितीचे अध्यक्ष अतुल देशमुख , सुशील मांजरे , शैलेश रावळ , विठ्ठल पाचर्णे , नितीन शाह , प्रवीण वायकर , मधुकर गिलबिले , संजय नाईकरे , प्रवीण गायकवाड , योगेश गायकवाड इत्यादी समितीचे मान्यवर उपस्थित होते , मातृभक्त हुतात्मा शिवराम हरी राजगुरु स्मारक निधी तर्फे विशेष प्रशस्ती पत्रक सर्व कीर्तनकार यांना सत्यशील राजगुरु यांच्या हस्ते देण्यात आली .सदरचा निधी न्यास हा राजगुरु यांचे थोरले बंधू , दिनकर राजगुरु यांनी स्थापन केलेला असल्याचे सत्यशील राजगुरु यांनी सांगितले .