हुतात्मा राजगुरू सोशल फाऊंडेशन तर्फे आदिवासी भागात दिवाळी फराळ कपडे वाटप

हुतात्मा राजगुरू सोशल फाऊंडेशन तर्फे आदिवासी भागात दिवाळी फराळ कपडे वाटप

निवृत्ती नाईकरे पाटील
मु.पो.ग्रामीण.

राजगुरूनगर येथील हुतात्मा राजगुरू सोशल फाऊंडेशन संस्थेच्या वतीने खेड तालुक्यातील पश्चिम आदिवासी भागात दिवाळी फराळ,नवीन कपडे वाटप करण्यात आले.परसुल खोपेवाडी,आढळवाडी,घोटवडी,वरचे भोमाळे,खालचे भोमाळे येथील आदिवासी भागात तीनशे फराळ किट, चारशे नवीन साड्या ,मुलींची कपडे वाटप करण्यात आली.
राजगुरुनगर शहरातील खेड तालुक्यातील देणगीदार यांच्या जमा केलेल्या निधी आणि वस्तुरूप मदतीतून हे वाटप करण्यात आले.
यावेळी या सर्व आदिवासी भागातील महिलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.
वाटप प्रसंगी हुतात्मा राजगुरू सोशल फाऊंडेशन अध्यक्ष ॲड.मनीषा ताई पवळे,उपाध्यक्ष बाळासाहेब सांडभोर,सचिव सचिन वाळुंज तसेच संचालक राजन जांभळे,संतोष सांडभोर,अमर टाटीया,दिलीप होले,शिल्पाताई बुरसे, नाजनीन शेख, एड.सुनील वाळुंज ,उत्तम राक्षे,संगीता ताई तनपुरे मधुकर गिलबिले,ग्रामसेवक मोनिका गुंजाळ,आकाश बोंबले,तसेच खोपेवाडी, घोटवडी आढळवाडी, भोमाळे खालचे ,वरचे गावचे सरपंच ,उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य,ग्रामस्थ महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.या वर्षी दिवाळी निमित फराळ कपडे वाटप करण्याचे फाऊंडेशनचे चौथे वर्ष आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजन जांभळे ,सूत्रसंचालन संतोष सांडभोर,आभार एड.मनिषताई पवळे यांनी मानले.