दहावी मध्ये प्रथम येणार्‍या विद्यार्थ्यास ध्वजारोहणाचा मान!उपक्रमशील शाळेचा परिपुर्ण उपक्रम!

निवृत्ती नाईकरे पाटील
मु.पो.ग्रामीण.

डायनॅमिक इंग्लिश मिडीयम स्कुल कडूस मध्ये दरवर्षी प्रमाणे या वर्षीही इयत्ता १० मध्ये प्रथम क्रमांक प्राप्त करना-या विद्यार्थ्याच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
डायनॅमिक इंग्लिश मिडीयम स्कुल कडूस येथे १५ ऑगस्ट ला इयत्ता १० मध्ये प्रथम क्रमांक प्राप्त करना-या विद्यार्थ्याच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येते.या वर्षी इयत्ता १० वी मध्ये प्रथम क्रमांक प्राप्त करणा-या कु.यशराज अशोक चव्हाण या विद्यार्थ्याच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री.प्रतापराव गारगोटे, व्यवस्थापिका सौ.जयश्री गारगोटे, मुख्याध्यापक श्री.निखिल ढमाले उपस्थित होते.कार्यक्रमाचे संयोजन रवीना गारगोटे यांनी केले.