बिबट्याच्या हल्यांचे सञ थांबेना!वडगाव पाटोळे येथे पुन्हा एका व्यक्तीवर प्राणघातक हल्ला!

कडूस प्रतिनिधी
मु.पो.ग्रामीण.

वडगाव पाटोळे गायकवाड वस्ती येथील श्री सुभाष निवृत्ती गायकवाड यांच्यावर आज सकाळी ६ वाजता कॅनॉल वर प्राण घातक हल्ला झाला. येथील स्थानिक नागरिकांना सतर्क रहाण्याचा इशारा देण्यात आला असून,या परिसरात बिबट्या च्या दहशतीचे वातावरण पसरले आहे.वनविभागाने येथील बिबट्याला त्वरीत जेरबंद करावा अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.