सेवानिवृत्त शिक्षकांच्या सामाजिक जाणीवेचे उपमुख्यमंत्र्यांकडून कौतुक

संदिप मेदगे प्रतिनिधी
मु.पो.ग्रामीण

पुणे-कोरोना महामारी, पुरपरिस्थिती, राज्यावरील आर्थिक संकटे पाहून आपला खारीचा वाटा आर्थीक योगदानाद्वारे आपत्ती ग्रस्तांसाठी देण्याचा संकल्प
सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षक असोसिएशन पिपंरी चिंचवड यांनी केला व रू 1.11.000 चा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधी करिता राज्याचे मा.उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे शुभहस्ते व विधान परिषदेच्या उपसभापती मा.निलमताई गो-हे यांचे प्रमुख उपस्थितीत मुख्यमंत्री सहायता निधीकडे वर्ग करण्यात आला.

सामाजिक जाणीव ठेवून दिलेल्या योगदानाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सेवानिवृत्त शिक्षक असोसिएशन पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष प्रल्हाद गिरगोसावी, सचिव अंकुशराव तानाजी, खजिनदार संजय बंगाळ. संचालक कृष्णकांत सासवडे,दिनेश ढोबळे व पदाधिका-यांचे कौतुक केले, सदर विधायक कार्य यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मिटकाॅनचे संचालक गणेश खामगळ यांनी मोलाचे योगदान दिले,

सेवानिवृत्त शिक्षक असोसिएशनच्या वतीने सतत समाजाभिमुख कार्यातून सेवाभाव जपला जात आहे,असोसिएशन द्वारे गेल्या वर्षी देखील 85.000 हजार रुपये मुख्यमंत्री सहायता निधी करिता देण्यात आले होते. असोसिएशनचे सर्व सेवानिवृत्त शिक्षकांनी मिळून महाराष्ट्र राज्यावर आलेल्या नैसर्गिक आपत्ती प्रसंगी सामाजिक बांधिलकीची जपणूक करून समाज बांधवांना मदत करणे कर्तव्य मानले आहे.
यावेळी आमदार चेतन तुपे.विभागीय आयुक्त मा.सौरभ राव,जिल्हाधिकारी डाॅ राजेश देशमुख व इतर मान्यवर उपस्थित होते.