15 दिवसात बहिरवाडी येथील रुग्ण संख्या साखळी तोडण्याचा निर्धार-मा.सभापती अंकुश राक्षे.

15 दिवसात बहिरवाडी येथील रुग्ण संख्या साखळी तोडण्याचा निर्धार-मा.सभापती अंकुश राक्षे.

आज बहिरवाडी ता.खेड येथे , मा.सभापती अंकुश राक्षे , गट विकास अधिकारी अजय जोशी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.बळीराम गाढवे यांच्या , मंडळ अधिकारी घुमटकर मॅडम , तलाठी धामणे मॅडम, सरपंच जगन्नाथ राक्षे , उपसरपंच अनिल भालेराव , ग्रामसेवक प्रशांत शेलार आरोग्य कर्मचारी , शिक्षक, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली ..
गेल्या काही दिवसात बहिरवाडी येथे 35 रुग्ण आढळले .. व 2 कारोणा बाधित रुग्णांचा मृत्यू झाला , व 3 संशयित रुग्णांचा मृत्यू झाला ..
रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असल्याने .. उपाय योजना करणे कमी बैठक झाली ..
*1) गावातील सर्व comorbid लोकांची तसेच सतत बाहेर कामानिमत्त जाणारा कामगार वर्ग, व high risk असलेली लोक अशा सर्व लोकांची कोरोना चाचणी एकाच दिवशी केली जाणार आहे .
*2) सर्व लोकांची आरोग्य तपासणी करून सर्वेक्षण करण्यात येणार आहे
*3) अत्यावश्यक सेवा वगळता सर्व गाव १० दिवस बंद असेल
*4) contact tracing चे प्रमाण वाढविणे
*5) गृह विलागिकरण नाही .. compulsary संस्थात्मक विलगिकरण कक्षात ठेवावे.
*6) व्हिटॅमिन टॅबलेट वाटप गावामध्ये करण्यात येणार आहे .

वरील निर्णय बैठकीत ठरले व येत्या 15 दिवसात रुग्ण संख्या साखळी तोडण्याचा निर्धार सर्वांनी केला .