Polyhouse तंत्रज्ञान वापरून आधुनिक शेतीची राजगुरुनगरच्या पश्चिम पट्ट्यामधे सुरुवात…

Polyhouse तंत्रज्ञान वापरून आधुनिक शेतीची राजगुरुनगरच्या पश्चिम पट्ट्यामधे सुरुवात…

निवृत्ती नाईकरे पाटील
मु.पो.ग्रामीण

खेड तालुक्यातील गुंडाळवाडी गावामध्ये पारंपरिक शेतीला वळण देत गावातील शेतकरी श्री. रघुनाथ धोंडिबा जैद यांनी आधुनिक तंत्रज्ञान वापरून शेती करण्यासाठी आपल्या शेतातील १५ गुंठे जमीनीवर पॉलिहाऊस उभारून त्यात निर्यात करण्यायोग्य हळदीच्या पीकाची दिनांक ३० आगस्ट रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत लागवड करून आधुनिक शेतीचा श्रीगणेशा केला. या प्रसंगी उद्योजक व वाडा कडूस गटाचे आधारस्तंभ संदीपभाऊ घनवट, देहू गावचे उद्योजक संतोष काळोखे, गुंडाळवाडी गावच्या सरपंच सुजाताताई भोर पा. माजी सरपंच मनीषाताई जैद..पोलीस पाटील संतोष भोर, प्रवीण जैद, स्वप्नील जैद, दिनकर जैद, महिंद्रा चे युनियन लीडर महेश राखूंडे, प्रगतशील शेतकरी आनंदराव काळोखे, शांताराम भोर, नंदाराम जैद, खंडू जैद, सुरेश जगदाळे, अमोल घुले, शांताराम जैद, पंढरीनाथ जैद, रवींद्र राखूंडे, दत्तात्रय राखूंडे, गणेश भोर हे मान्यवर उपस्थित होते.